मल्ल्या अर्थमंत्र्यांबरोबर संगनमत करुन देशाबाहेर पळून गेला – राहुल गांधी

14

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात पळून गेलेला  उद्योगपती विजय मल्ल्याला आपण भेटलो नाही, हा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा खोटा आहे. तर मल्ल्या अर्थमंत्र्याबरोबर संगनमत करुन देशाबाहेर पळून गेला. हे सरकार राफेल, विजय मल्ल्यावर खोटे बोलत आहे. अर्थमंत्र्यांनीच मल्ल्याला देशाबाहेर पळून जाण्यासाठी मोकळीक दिली. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवारी) येथे केली.