मल्टिप्लेक्समध्ये आजपासून बिनधास्त न्या बाहेरचे खाद्यपदार्थ!

423

मुंबई, दि. १ (पीसीबी) –  मल्टिप्लेक्समध्ये आजपासून तुम्हाला बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहे. शिवाय मल्टिप्लेक्सच्या आवारात मिळणारे खाद्यपदार्थही छापील किंमतीतच मिळतील. सरकारकडून या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. जे मल्टिप्लेक्स हे आदेश पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.

हायकोर्टाने वारंवार प्रश्न उपस्थित करुनही थिएटरमधील खाद्य पदार्थांच्या मनमानी किमती कमी होत नव्हत्या. शिवाय मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेने आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी थिएटर कर्माचऱ्यांना मारहाणही केली होती. त्यानंतर हा मुद्दा राज्यभर गाजला होता.