मला युद्ध आवडत नाही पण मी देशभक्त; अमेरिकेतील महिलेला प्रियांकाचे सडेतोड उत्तर

284

वॉशिंग्टन, दि.१२ (पीसीबी) – मला युद्ध आवडत नाही. पण मी देशभक्त आहे, असे अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणाली आहे. अमेरिकेतील एका कार्यक्रमात प्रियांकाला एका महिलेने प्रशन विचारला होता. त्यावर प्रियांकाने हे उत्तर दिले.

तू संयुक्त राष्ट्राची सद्भावना दूत आहेस. तरीही पाकिस्तानविरोधातील अणुयुद्धाला तू प्रोत्साहन देत आहेस, असे अमेरिकेतील महिला प्रियांकाला म्हणाली होती. त्यावर प्रियंका आपले मत व्यक्त करताना म्हणाली, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते, मला युध्द आवडत नाही. पण मी देशभक्त आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ला केला. त्यावर प्रियांकाने २६ फेब्रुवारी रोजी ट्विट करून जवानांचे अभिनंदन केले होते.