‘मला जूही चावलासोबत लग्न करायचे होते’- सलमान खान

63

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – सोशल मीडियावर रोज नवनवीन अफवांचा बोलबाला असतो. मग ती गोष्ट प्रसिद्ध अभिनेत्याशी जोडलेली असेल, तर मग काय बघायलाच नको. अगदी कमी वेळात ती व्हायरल होऊन त्या व्यक्तीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनेता सलमान खानचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ २६-२७ वर्षापूर्वीचा आहे. या व्हिडीओमध्ये सलमानने चक्क ‘मला अभिनेत्री जूही चावलासोबत लग्न करायचे होते,’ असा खुलासा केलाय. ‘जूही खूप गोड आणि प्रेमळ आहे. जूहीला माझ्यासोबत लग्न करू द्या. असे मी तिच्या वडिलांना विचारले देखील होते. मात्र त्यांनी नकार दिला. कदाचित त्यांना मी पसंत नसेल,’ असे सलमानने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
एकेकाळी अनेक हिट चित्रपट दिलेली ही जोडी आता एकमेकांशी बोलणेही पसंत करत नाहीत. जूहीने सलमानसोबत एक चित्रपट करण्यास नकार दिला होता. म्हणूनच सलमानने जूहीसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अलिकडे जूहीने सलमानसोबत काम करायची इच्छा व्यक्त केली होती. पण सलमानने जूहीच्या या इच्छेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सलमान आणि जूहीमधलं हे शीतयुद्ध कधी थांबणार हे त्यांनाच ठावूक. मात्र त्यांचे चाहते त्यांना पून्हा एकदा एकत्र बघण्यासाठी उत्सुक आहेत, हे मात्र नक्की!