मला कधी जात सांगायची वेळ आली नाही – नाना पाटेकर

502

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) –  आजपर्यंत मला कधी माझी जात विचारण्यात आली नाही, मला कधी जात सांगायची वेळही आली नाही, पण आज सगळे चित्र पाहिले की जातीय विषमता समजते, अशा शब्दांत  प्रसिध्द  अभिनेते नाना पाटेकर यांनी जातियवादावर भाष्य केले आहे.  

विले पार्लेतील विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमीचे नामकरण सोहळ्यात नाना बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही उपस्थित होते.

यावेळी नाना म्हणाले की,  शाळेत शिकत होतो तेव्हापासून मला आजपर्यंत कोणीही जात विचारली नाही. पण आजची परिस्थिती पाहून वैष्यम्य वाटते. कलावंत हीच माझी जात आहे. मला प्रेक्षकांनी कलावंत म्हणूनच स्वीकारले, माझी जात कोणी विचारली नाही. मला ती सांगायची गरजही वाटली नाही.