‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’… या गाण्यावर आमदार भरणेंचा झिंगाट डान्स

843

 इंदापूर, दि. १५ (पीसीबी) – तालुक्यातील पळसदेव येथे  शिवशाही व भीमशाही युवा प्रतिष्ठाणच्या वतीने  दहीहंडी उत्सवाचे शुक्रवारी (दि.१४) रात्री आयोजन केले होते. यावेळी उपस्थित असणारे  राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी ‘राष्ट्रवादी पुन्हा’ …. या गाण्यावर डान्स करून कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली.    

कार्यकर्त्यांनी  केलेल्या आग्रहास्तव भरणे यांनी  ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’… ‘झिंग झिंग झिंगाट’ …. या गाण्यावर चांगलाच  ठेका धरला. विशेष म्हणजे तब्बेत बरी नसतानाही  डान्स करून भरणे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी नेत्यांची भाषणे झाल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार भरणे  भाषण करणार होते. मात्र, कार्यकर्त्यांनी त्यांना डान्स करण्याचा आग्रह केला. त्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरलेल्या भरणे यांना कार्यकर्त्यांनी  खांदावर उचलून घेत त्यांना थिरकायला लावले. त्यांनीही चांगला प्रतिसाद देत कार्यक्रमात रंगत आणली.