मर्द असाल तर कोर्टात माझ्याविरोधात लढा; अंजली दमानियांचे खडसेंना आव्हान

120

जळगाव, दि. २१ (पीसीबी) – भाजपचे माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसेंचे पद गेल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. थर्ड ग्रेडेड राजकारण करण्यापेक्षा मर्द असाल तर माझ्याविरूद्ध कोर्टात येऊन लढून दाखवा, असे आव्हान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांना दिले आहे. खडसे यांनी न्यायालय व पोलिसांची दिशाभूल करून आपल्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे धनादेश प्रकरणात आमदाराच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करणार असल्याचेही दमानिया यांनी सांगितले.

खडसे आणि भुजबळ हे दोन्ही ओबीसी नेते एकत्र येत असल्याचे माहित पडले. या दोन्ही नेत्यांविरूध्द मी लढत आहे. असे दहा भुजबळ, दहा खडसे जरी एकत्र आले तरी त्यांना मी पुरून उरेन. भ्रष्ट लोक एकत्र येत असतील तर लोकांनीच ठरवावे. ते पुढे निवडूनही येणार नाहीत, असेही दमानिया म्हणाल्या.