मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृतीसाठी १०० हून अधिक केसेस राज ठाकरेंनी अंगावर घेतल्या

189

मुंबई, २३ (पीसीबी) – बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून गोरेगावच्या नेस्को कॉम्प्लेक्समध्ये मनसेने महाअधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात राज ठाकरेंनी आपल्या झेंड्याचे अनावरण केले. त्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी उपस्थितांना संबोधित केले आहे.

बोलताना अभ्यंकर म्हणाले, पक्ष स्थापन झाल्यानंतर आपल्या अनेक संघटना स्थापन झाल्या, प्रत्येक संघटनेने उल्लेखनीय अशी कामं केलेली आहेत. पक्ष फक्त १३ वर्षांचा आहे, पण जनतेच्या राज ठाकरे आणि आपल्याकडून प्रचंड जास्ती अपेक्षा आहेत. मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृतीसाठी १०० हून अधिक केसेस राज ठाकरेंनी अंगावर घेतल्या असल्याचा दावा अभ्यंकर यांनी केला.

WhatsAppShare