मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

45

औरंगाबाद, दि. २३ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबादजवळील कायगाव टोक येथे एका तरुणाने पुलावरुन गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवार दुपारी घडली.

काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील कानडगावात राहणारा काकासाहेब शिंदे हा तरुण मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी औरंगाबादला आला होता. आज सोमवारी दुपारी  कायगाव टोक येथील गोदावरी नदीवरील पुलावरुन त्याने उडी मारली. स्थानिक पोलिसांनी तातडीने काकासाहेब शिंदेला पाण्याबाहेर काढले. त्याची रवानगी घाटी रुग्णालयात करण्यात आली मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.