मराठा समाजाला कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

46

मुंबई, दि. २ (पीसीबी) – राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ, अशी ग्वाही आज (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृहात मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित मान्यवरांच्या बैठकीतील चर्चेनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर कुठल्याही आदोलनादरम्यान हिंसा होऊ नये. तसेच आत्महत्येचे पाऊल कोणीही उचलू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.