मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास तीव्र विरोध – संजय कोकरे

848

मुंबई, दि. १ (पीसीबी) – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध आहे, असे ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.   

गोखले इन्स्टिट्यूटने  मराठा समाजाचा ओबीसी  प्रवर्गामध्ये समावेश करण्याबाबत अहवाल दिला आहे. या अहवालात विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठा समाजाचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे येथील अनुमान संपूर्ण महाराष्ट्राला लागू करता येणार नाहीत. मराठा समाजातील कष्टकरी,  माथाडी कामगार, ऊसतोड कामगार आदी  घटकांचा अभ्यास कऱण्यात आला आहे. मात्र, बागायतदार, संचालक, राजकारणी, व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे हा अभ्यास एकांकी वाटत आहे.

आम्हाला दिलेली आकडेवारी आणि सरकारच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात फरक  आहे. अशा अनेक त्रुटी या अहवालात दिसून आलेल्या असून माहिती चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे. त्यामुळे हा अहवाल  अयोग्य आहे, असे  कोकरे यांनी  सांगितले. यापूर्वी  राज्य मागासवर्ग आयोगाने खत्री आयोग, सराफ आयोग, बापट आयोग असे तीन अहवाल सादर केले आहेत.   त्यांच्या निर्णयाचा उल्लेखही सरकारी शपथपत्रात करण्यात आलेला नाही .