मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलकांकडून हिंजवडीत रास्ता रोको

213

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठी आज (सोमवार) हिंजवडीतील मुख्य चौकात सकाळपासून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज हिंजवडी बंदची हाक दिली आहे. यामुळे हिंजवडी परिसरातील सर्व शाळा, कॉलेज आणि दुकाने सकाळपासून बंद आहेत. काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रामाणात पोलिसांचा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे. सध्या महामार्गावरील एक लेन आंदोलकांनी बंद केली असून एका लेन वरुन वाहतूक संत गतीने सुरु आहे.