मराठा तरूणावर गुन्हे दाखल झाल्याने नोकऱ्या मिळणार का? – राज ठाकरे

74

नवी मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी तरुणांवर ३०७ कलमाअंतर्गत गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. त्यामुळे आता आरक्षण मिळाले तरी त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही, असे   राज ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच मराठा आंदोलनात परप्रांतियांच्या सहभागावरुनही सरकारवर राज ठाकरे यांनी निशाणा साधला.

नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कर्मचारी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.