मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये ८ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

108

लातूर, दि. ३१ (पीसीबी) – लातूर जिल्ह्यातील औसा येथील तहसील कार्यालयात आज (मंगळवार) दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या ८ कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) औसा येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. ‘एक मराठा…लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, अशा जोरदार घोषणा देत काही कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात प्रवेश केला. त्यापैकी ८ कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली.