मराठा आरक्षणासाठी राजीनामास्त्र; भाऊसाहेब चिकटगावकरांचा आमदारकीचा राजीनामा   

131

औरंगाबाद, दि. २५ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांनी राजीनामास्त्र उपसले असून  शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.  

भाऊसाहेब चिकटगावकर औरंगाबादमधील वैजापूरचे आमदार असून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आपण आमदारकीचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात माणसे मरू लागली आहेत. संपूर्ण महाराष्ट्र पेटला, तरी आपले सरकार काहीही करायला तयार नाही. सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र, सरकारची तशी इच्छा दिसत नाही, अशी टीका करून कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा सुपूर्त केला आहे.