मराठा आरक्षणासाठी निलेश राणेंचे रस्त्यावर ठिय्या!

146

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करत सरकारला कोंडीत पकडत आहेत. आता माजी खासदार निलेश राणे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

मराठा आरक्षणासाठी निलेश राणे यांनी मुंबई-गोवा महामार्ग ठिय्या आंदोलन करून महामार्ग रोखला. तसेच मराठा मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.

दरम्यान, आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चांने सरकारला डेडलाईन दिली आहे. त्यामुळे सरकार आरक्षणाच्या मागणीवर काय भूमिका घेते, पाहणे महत्वाचे ठरणार आहे.