मराठा आरक्षणासाठी घटना दुरूस्तीची गरज नाही – नारायण राणे

85

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरूस्ती करण्याची कोणतीही गरज नाही, असे महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले आंदोलन आता थांबायला हवे, असे सांगून आंदोलकांना राणे यांनी शांततेचे आवाहन केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणे बोलत होते.