मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा

52

औरंगाबाद, दि. ३१ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी राज्याचे माजी मंत्री आणि सिल्लोड-सोयगाव विधानसभेचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. सत्तार यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. सरकार मराठा समाजासोबतच सर्वांवर अन्याय करत असल्याचे सांगून त्यांनी विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला.  

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन  पेटले आहे.  तसेच राजकीय पक्षांनीही बैठका घेऊन आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. राज्यातील आतापर्यंत पाच आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. अब्दुल सत्तार राजीनामा देणारे सहावे आमदार ठरले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे भरत भालके, भाजपचे राहुल आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे, शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी राजीनामे दिले आहेत.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांची विधानभवनात बैठक झाली. यामध्ये काँग्रेस आमदारांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोर तीव्र भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे सर्व आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे.