मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची नदीत उडी

93

औरंगाबाद, दि. २४ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी कायगाव टोका येथे सोमवारी झालेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान गोदावरी नदीत एका कार्यकर्त्याच्या बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कन्नड तालुक्यात आणखी एका कार्यकर्त्याने नदीत उडी घेतली आहे. नदी कोरडी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेली माहिती अशी की, कन्नड तालुक्याती देवगाव रंगारी येथे सोमवारी ही घटना घडली. मराठा आंदोलनादरम्यान एका तरुणाने थेट नदीत उडी घेतली. जगन्नाथ सोनवणे याने नदी कोरडी असल्याने तरुण वाळूवर आपटला गेल्याने तो जखमी झाला आहे. त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.