मराठा आरक्षणासंदर्भात शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करा- उच्च न्यायालय

38

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणाचे काय झाले? आरक्षणासंदर्भातील अहवाल कधी सादर करणार? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज (बुधवारी)  सुनावणी झाली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.  

आरक्षणाचा मुद्दा तात्काळ निकाली काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सरकारले चांगलेच धारेवर धरले.  दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मागच्यावर्षी राज्यभरात मराठा समाजाचे मूक मोर्चे निघाले होते. लाखो लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.