मराठा आरक्षणावर नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही पूर्ण करणार – मुख्यमंत्री फडणवीस

36

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मराठा आरक्षणावर कुठल्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिना संपेपर्यंत कार्यवाही पूर्ण केली जाईल,  असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासाठी काही निकष दिले आहेत. त्या पूर्ण केल्याशिवाय आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. आरक्षण टिकवून ठेवण्यासाठीच राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली आहे. हा आयोग सरकारने स्थापित असून पूर्णपणे स्वायत्त आणि स्वतंत्र आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.