मराठा आंदोलनात घातपातासाठी स्फोटकांचा वापर होणार होता – जितेंद्र आव्हाड

87

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी छापा टाकून स्फोटके हस्तगत केली. ही स्फोटके मराठा आंदोलनादरम्यान घातपात करण्यासाठी होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होता, असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  केला आहे.