मराठा आंदोलनात घातपातासाठी स्फोटकांचा वापर होणार होता – जितेंद्र आव्हाड

375

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी छापा टाकून स्फोटके हस्तगत केली. ही स्फोटके मराठा आंदोलनादरम्यान घातपात करण्यासाठी होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होता, असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  केला आहे.

वैभव राऊत व त्याच्या दोन साथीदारांकडून जप्त केलेली ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब तयार करण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती.  महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

तर नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक करण्यात येते. तर सनातनचे वकील संजीव पुनाळेकर बॉम्बस्फोटातील आरोपींचे खुलेआम समर्थन करत आहेत. त्यांची पाठराखण करत आहेत. त्यामुळे त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्याची गरज आहे, असेही  आव्हाड यांनी म्हटले आहे.