मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील दारु विक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

176

पुणे, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सकल मराठा समाजा’ने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी खबरदारी म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व परमीट रूम, देशी-विदेशी दारु विक्री केंद्रे, ताडी विक्री दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आज (गुरुवार) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही सर्व दुकाने बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम १९४९ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशारा ही देण्यात आला आहे.