मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक परिसरातील कंपन्या गुरुवारी बंद

302

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – उद्या गुरुवारी (दि.९ ऑगस्ट) क्रांती दिनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद मुळे दक्षता म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील अपवाद वगळता बहुतांश कंपन्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक परिसर आहे. या ठिकाणी छोट्या आणि मोठ्या कंपन्या आहेत. त्यामध्ये स्थानिक आणि परप्रांतीय नागरिक मोठ्या संख्येने काम करतात. यामुळे कामगारांसोबत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश ठिकाणच्या कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच शहरात टाटा, महिंद्रा आणि बजाज या सारख्या मोठ्या कंपन्या आहेत. यावर बहुतांश लघुउद्योगीक कंपन्या अवलंबून असतात त्यामुळे गुरुवारी पुकारण्यात आलेला बंद पिंपरी-चिंचवड शहरात काही प्रमाणात यशस्वी होण्याची चिन्ह आहेत.