मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज राज्यभर बैठकींचा धडाका  

24

पुणे, दि. ५ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढची नेमकी दिशा ठरवण्यासाठी आज (रविवार) मराठा आरक्षण परिषदेने पुण्यात महत्त्वाची बैठक बोलावली   आहे. या बैठकीसाठी मराठा समाजातील प्रतिष्ठीत समन्वयक, संशोधक, तज्ञ, अभ्यासक तसेच खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.

त्याचबरोबर  आरक्षणाच्या मागणीवर विचार विनियम  करण्यासाठी राज्यातही विविध बैठकांचे आयोजन केले आहे. मुंबईतही घाटकोपरच्या शिवाजी महाराज मैदानात बैठक  होणार आहे. ९ ऑगस्टला नियोजित असलेल्या आंदोलनाबाबत नियोजन करण्यासाठी मुंबईत मराठा संघटनांची बैठक होणार आहे.

पुण्यात आज दुपारी १ ते ४ या दरम्यान बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा समाजाची आंदोलनाची पुढची दिशा ठरवली  जाण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचे आंदोलन सुरूच आहे. आज धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तर, पालघरमध्येही धरणे आंदोलन होणार आहे.