मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज राज्यभर बैठकींचा धडाका  

80

पुणे, दि. ५ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढची नेमकी दिशा ठरवण्यासाठी आज (रविवार) मराठा आरक्षण परिषदेने पुण्यात महत्त्वाची बैठक बोलावली   आहे. या बैठकीसाठी मराठा समाजातील प्रतिष्ठीत समन्वयक, संशोधक, तज्ञ, अभ्यासक तसेच खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.