मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा – उध्दव ठाकरे 

69

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी  पुकारलेल्या आंदोलनादरम्यान ज्या  तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते गुन्हे मागे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा,  असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी म्हटले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर आज (मंगळवार) भेट घेतली.  यावेळी उद्धव ठाकरेंनी आपण मराठा समाजासोबत असल्याचे सांगितले.