मराठा अारक्षणासाठी घटनादुरुस्ती करा; त्यासाठी विराेधकांना एकत्र अाणण्याची जबाबदारी माझी – शरद पवार

201

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाला अारक्षण देण्यासाठी घटनादुरुस्तीत बदल करण्याची अावश्यकता अाहे, परंतु सरकार एकटे निर्णय घेऊ शकत नाही. घटना बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला अाहे. त्यामुळे संसदेत जाऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न अाहे. घटनादुरुस्तीतून मराठा समाजाला खुश करण्याचा प्रश्नच नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी केले. मराठा अारक्षणासाठी घटनादुरुस्ती करा, त्यासाठी सर्व विराेधकांना एकत्र अाणण्याची जबाबदारी मी उचलेन, अशी हमी शरद पवारांनी सरकारला दिली अाहे.

परंतु ही घटनादुरुस्ती नेमकी कशी हाेर्इल हे पवारांनी स्पष्ट करावे, अन्यथा हे विधान समाजाला खुश करणारे ठरेल, असे वक्तव्य प्रकाश अांबेडकर यांनी नाशिकमध्ये केले हाेते. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. ते रविवारी षण्मुखानंद सभागृहात दि. महानगर काेअाॅपरेटिव्ह बँकेचे नामकरण अाणि बाेधचिन्ह अनावरण कार्यक्रमावेळी प्रसार माध्यमांशी बोलत होत. ते म्हणाले, शनिवारी विधिमंडळात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत कायदेशीर अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने एकत्र पाऊल टाकण्याचे ठरवण्यात अाले. ताे निर्णय यशस्वी कसा हाेर्इल हे पाहणे आपले काम अाहे. ते हाेऊ शकले तर हा प्रश्न सुटेल. त्या कामाला अधिक प्राधान्य देणे मला गरजेचे वाटते.