मराठवाडा जनविकास संघातर्फे ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ साजरा

206

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – नव्या पिढीला मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणजे काय? हे समजावले व समजले पाहिजे. असंख्य हुतात्म्याच्या बलिदानातून, अनेकांच्या त्यागातून सर सेनानी रामानंद तीर्थ, माणिकचंद पहाडे विजयेंद्र काब्रा यासारख्या समर्थ निकारांच्या लढ्यातून स्वातंत्र्य मिळालेला मराठवाडा आजच्या तरुण पिढीला ज्ञात व्हावा म्हणून आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचे मोल नव्या पिढीला समजले गेले पाहिजे या हेतूने मराठवाडा जनविकास संघ  संचालित चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती व सर्व मराठवाडा भूमीपुत्र यांनी ‘७१ व्या  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना’ निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

मागील १० वर्षापासून मराठवाडा जनविकास संघ मार्फत मुक्तीसंग्राम दिन हा आपल्या मराठवाडयातील नावलौकिक झालेल्या बंधावाना पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात येत, सालाबादप्रमाणे मोठ्या प्रमाणात होणारा खर्च मराठवाड्यातील बांधवांना मदत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यामध्ये गरजुंना शैक्षणिक मदत तसेच पावसाळ्यात पाऊस न होणे याचे प्रमुख कारण म्हणजे पर्यावरणाचा असमतोल. यासाठी… वृक्षारोपण करणे, त्याचे संगोपन करणे जनावरांना चारा यासाठी आपण कार्य करणार आहोत. हे आपल्या मराठवाडावाशीय शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त ठरेल.

महापौर राहुल जाधव, प्रकाश मुत्तेळ  जॉईट पोलीस कमिशनर, अशोक काशिद अध्यक्ष माजी सैनिक विकास संघ दिघी, डॉ.विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक , व्यंकटराव भदाले, ओमप्रकाश पेठे – लाईन क्लब सदस्य  अतिरिक्त आयुक्त अमृत सावंत, डी.एस.राठोड सामाजिक कार्यकर्ते,  दत्तात्रय जगताप, लक्ष्मण उंडे, बाबासाहेब त्रिभुवन- नगरसेवक, नरेंद्र माने, नगरसेवक गोपाळ माळेकर, यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीरानच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करून सुरुवात झाली.

ह.भ.प. प्राध्यापक डॉ. गजानन व्हावळ यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम चा इतिहास नव्या पिढीसमोर सांगितला त्यांच्या बोलण्यातून प्रत्यक्ष तो नजरेसमोर उभा राहिला सर्वाच्या अंगातील रक्त सळसळून आले यासर्वातून एक उतराई म्हणून ४० माजी सैनिकांचा संविधान व गूलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला. तसेच धैर्यशील बुवा यांची नगर रचनाकार म्हणून निवड झाल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये सैनिकांनी आपले मनोगत व्यक्त करत समाजाला व देशाला या अशा अनेक उपक्रमाची गरज आहे यामधूनच तरुण पिढी समाज सेवेसाठी व देश सेवेसाठी तयार होईल असे बोलून तरुणांना सज्ज होण्यासाठी आवाहन केले.

स्वराज तांबे या बाल कलाकाराने स्वातंत्र्य विरासाठी गीत सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी अध्यक्षीय मनोगत मध्ये असेच कार्य पुढे करत राहील व समाजाला वेळोवेळी सहकार्य करत राहील असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे निवेदन वामन भरगंडे आणि अलका जोशी यांनी केले. व नितीन चिलवंत यांनी कार्यक्रमाची सांगता पसायदान म्हणून केली.

यावेळी समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, श्रीमती उंडेताई स्थानिक नगरसेविका, ह.भ.प तुकारामभाऊ महाराज, ह.भ.प तांदळे महाराज, सूर्यकांत कुरुलकर, सुनील काकडे, शंकर तांबे, सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जगताप,  मराठवाडा जनविकास संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले.

WhatsAppShare