मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट व भंडारा डोंगर समितीच्या वतीने भंडारा डोंगरावर वृक्षारोपण

74

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगर समिती यांच्या संयुक्तविद्यमाने ५०० वृक्षांची भंडारा डोंगर येथे लागवड करण्यात आली. यामध्ये वड, चिंच, जांभळ, पिंपळ, आवळा, कडूलिंब, तुती, वाकुळ, उंबर, रूई अशी झाडे लावण्यात आली आहेत. यावेळी झाडे लावून त्यांचे पुढील तीन वर्षे पाण्याची व्यवस्था करून संगोपन ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे. ट्रस्टच्या वतीने गेली सलग पाच वर्षे विविध भागात एक हजार वृक्षांची लागवड केली आहे.

यावेळी आमदार संजय (बाळा) भेगडे, शिवानंद महाराज, बबृवान वाघ महाराज, कुरेकर बाबा महाराज, बाबूराव महाराज तांदळे, शिवव्याख्याते गजानन वाव्हळ, ढमाले महाराज, सरपंच रंजनाताई शेंडे, ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, ग प्रभाग सदस्य बाबासाहेब त्रिभुवन, माधव मनोरे, सुर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, नितिन ताटे, सारिका भोजने, कीर्ती पडवळ, अंकुश ढोरे, वर्षा गाडे, रवींद्र दाभाडे, कैलास भेगडे, बजरंग माळी, विजय सोनवणे, नामदेव पवार, दीपक जाधव, अनिसभाई पठाण, मुंजाजी भोजने, सुनील नाईकनवरे, मुकेश पवार, प्रकाश बंडेवार, किशोर आट्टरगेकर, दत्ता असवले, सखाराम वालकोळी, युवराज नलावडे, भरत शिंगोटे, प्रकाश इंगोले, गजानन माने, उमाकांत तळवडे संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघ, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.