मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

24

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व फोल्डर फाईल देऊन गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी केवळ गुणवंत न होता शिलवंत होणेही गरजेचे आहे. आपली संस्कृती जपत चांगला अभ्यास करून नावलौकिक मिळवावा, असे आवाहन संत साहित्याचे अभ्यासक बब्रुवान महाराज यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी समाज प्रबोधनकार शारदा मुंडे, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार,  सूर्यकांत कुरुलकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य आदिती निकम, सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर आगलावे, हेमंत पाटील, संतोष आरगुलवाड, अजीज सिद्धीकी, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

सुर्यंकांत कुरूलकर यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रेय धोंडगे यांनी सुत्रसंचालन केले. तर, वामन भरगांडे यांनी आभार मानले.