मरकळ येथील गावठी दारुची भट्टी आळंदी पोलिसांनी केली उध्दवस्त

135

आळंदी, दि. १३ (पीसीबी) – मरकळ येथे सरासपणे सुरु असलेली गावठी दारु बनवण्याची भट्टी आळंदी पोलिसांनी उध्दवस्त केली आहे. यामध्ये २०० लिटर गावठी दारू बनविण्याचे कच्चे रसायन आणि साधने असा एकूण ३ हजार ५०० रुपये किंमतीच्या ऐवजाचा समावेश होता.

आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरकळ येथे गावठी दारूभट्टी सुरु असल्याची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आळंदी पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकूण दारूभट्टी उध्दवस्त केली. यामध्ये २०० लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन आणि साधने असा एकूण ३ हजार ५०० रुपये किंमतीचा माल होता. तसेच येणाऱ्या काळात आळंदीतील अवैध धंद्यांवर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.