‘ममता बॅनर्जी सरड्यासारख्या; त्यांच्यावर काडीचाही विश्वास ठेवू नका’

53

कोलकाता, दि. ३ (पीसीबी) – यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच भेट घेतली. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममतांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ममता या सरड्यासारख्या रंग बदलणाऱ्या आहेत. त्यांच्यावर काडीचाही विश्वास ठेवू शकत नाही. काँग्रेस आणि अन्य नेत्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवू नये. ममतांमध्ये पंतप्रधानपदाची लालसा निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.