मनोहर पर्रीकर उपचारासाठी एम्समध्ये दाखल; मुख्यमंत्रीपद सोडणार?

345

पणजी, दि. १५ (पीसीबी) – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात येणार आहे. पर्रीकर ६ सप्टेंबरला अमेरिकेतून उपचार घेऊन परतले. गेल्या सात महिन्यांपासून आजारी असलेल्या पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

पर्रीकर यांना बुधवारी पणजीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळीच ते एम्समध्ये उपचार घेण्यासाठी दिल्लीला रवाना झालेत. तर पुढील उपचारासाठी ते न्यूयॉर्कला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपचारासाठी पर्रीकर आतापर्यंत तीन वेळा अमेरिकेत जाऊन आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे पर्रीकर यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.