मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवाचे पंतप्रधान मोदींनी घेतले अंत्यदर्शन

165

पणजी, दि. १८ (पीसीबी) – मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.  तसेच  संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन,  केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी अंत्यदर्शन घेतले.   तर रविवारी रात्रीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात पोहचले होते.   भाजपचे अनेक दिग्गज नेते पर्रिकरांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले आहेत.

मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव कला अकादमीत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यावेळी अंत्यदर्शन घेताना स्मृती इराणी यांनी अश्रू अनावर झाले.  पर्रीकर यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी भाजप मंत्री, नेते गोव्यात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर पर्रीकरांच्या पर्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली आहे.

रविवारी सायंकाळी मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. त्यांनी स्वादूपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. यावर त्यांनी मुंबई, दिल्ली, न्युयार्क येथे उपचार घेतले होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यांच्या दोनापावला येथील निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर रविवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.