मनोरुग्ण मुलीसोबत अश्लील चाळे; एकावर गुन्हा दाखल

125

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – मनोरुग्ण असलेल्या मुलीसोबत एकाने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास भोसरी परिसरात घडली.

संजय शेषराव भालेराव (रा. दिघी रोड, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बुधवारी (दि. 13) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 30 वर्षीय पीडित मुलगी मनोरुग्ण आहे. ती घरी एकटी असल्याचा गैरफायदा आरोपीने घेतला. फिर्यादी यांच्या घरी जाऊन मनोरुग्ण मुलीसोबत आरोपीने अश्लील चाळे केले. त्यानंतर आरोपी निघून गेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare