मनास लज्जा उत्पन्न होईल; असे कृत्य करून महिलेचा विनयभंग

120

देहूरोड, दि. २१ (पीसीबी) – जागा बिल्डरला देत नाही, या कारणावरून मारहाण करून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 20) किवळे येथे घडली. समीर मनोहर तरस, बाळू तरस, संजय तरस, सागर तरस, साहिल तरस, अजय धिडे, अशी आरोपींची नावे आहेत. पीडित महिलेने या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राहात असलेली जागा बिल्डरला देत नाहीत, या कारणावरून आरोपी हे फिर्यादीच्या घरात घुसले. फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून आरोपींनी फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी यांच्या मुलांना शिवीगाळ करून मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare