मनसे नगरसेवक सचिन चिखले निगेटिव्ह

54

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – मनसेचे नगरसेवक सचिन चिखले पॉझिटिव्ह असल्याच्या मेसेजमुळे प्राधिकऱणातील त्यांच्या समर्थकांमध्ये खळबळ होती. प्रत्यक्षात आपण एकदम तंदुरुस्त आहोत, आपला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे स्वतः चिखले यांनी पीसीबी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

नागरिकांशी विविध कारणांमुळे सतत संपर्कात असलेले महापालिकेतील अनेक नगरसेवक सद्या भितीच्या सावटाखाली आहेत. चिखले यांचे सहकारी नगरसेवक उत्तम केंदळे हे पॉधिटिव्ह आढळले. त्यांच्याबरोबर कायम वाहनातून फिरणारे म्हणून चिखले यांचेही नाव कोरोना बाधित असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. चिखले म्हणाले, मी चाचणी केली आणि रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. माझी प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि नागरिकांची कृपा असल्याने मला काहीच झालेले नाही.

WhatsAppShare