मनसेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खून केला – संतोष शिंदे

202

पुणे, दि.२३ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे आहेत. त्यांनी लोककल्याणाकारी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य चालवण्यायाठी त्यांनी राजमुद्रेची निर्मिती केली. राजमुद्रा ही प्रशासकीय बाब आहे. महाराजांच्या काळात राजमुद्रा पत्रावर उमटत नव्हती किंवा राजमुद्रेचा शिक्का मारला जात नव्हता तो पर्यंत तो व्यवहार अधिकृत मानला जात नव्हता. इतकी ताकत त्या राजमुद्रेमध्ये आहे असे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले.

आज मनसेने भगव्या झेंडयावर राजमुद्रा उमटवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खून केला आहे. हा शिवद्रोह आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी जातीचे रंग बाजूला ठेऊन १४ वर्षात राजकीय जहाज बुडाल्यानंतर राज ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमुद्रेचा आधार घ्यावा लागला असे संतोष शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ लक्ष घालून कायदेशीर कारवाई करावी. मनसेने झेंडयावरुन राजमुद्रा हटवली नाही तर, संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरुन आपल्या स्टाइलने आंदोलन करेल असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला.

#राजमुद्रा असलेला मनसेचा झेंडा तयार झालेला आहे. मते मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा 'राजमुद्रे'चा वापर होऊ नये…

Gepostet von Santosh Shinde – संभाजी ब्रिगेड, पुणे. am Dienstag, 21. Januar 2020

WhatsAppShare