मनसेचे औरंगाबादमध्ये २३ जुलैला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

46

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – मनसेला नवी उभारी देण्यासाठी राज ठाकरे आणि त्यांच्या नव्या टीमने पुन्हा एकदा प्रयत्न सुरु केले आहेत. मनसे आता मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

२३ जुलैला औरंगाबादमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर १९ जुलैपासून राज ठाकरे स्वतः मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.

राज ठाकरे मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. मुख्यतः शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यावर त्यांचा भर असणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून कळाली आहे.