मनमाड-इंदूर, कल्याण-कसारा, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला मंजुरी – नितीन गडकरी

214

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – मनमाड ते इंदूर, कल्याण-कसारा, कोल्हापूर- वैभववाडी या रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याची घोषणा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरूवार) केली. मनमाड ते इंदूर  रेल्वेमार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांनी दिली.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र, तीन ते चार वर्षात हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास नेण्याचे आदेश दिले आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. दरम्यान, कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आहे. तसेच बऱ्याच दिवसांपासून मागणी होत असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गालाही मंजुरी देण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.

धुळ्याजवळ ड्राय पोर्ट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक, कृषीविषयक विकासाला चालना मिळेल,’ असा विश्वास यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला.