‘मदरशांमध्ये नथुराम गोडसे आणि प्रज्ञा ठाकूरसारखे लोक जन्माला येत नाहीत- आझम खान

84

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेच्या निमित्ताने भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मदरसा नथुराम गोडसे आणि प्रज्ञासिंह ठाकूरसारेख लोक जन्माला घालत नाही’, असे वक्तव्य आझम खान यांनी केले आहे.

मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना असून त्यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना आझम खान यांनी म्हटले की, ‘मदरशांमध्ये नथुराम गोडसेच्या स्वभावासारखी किंवा प्रज्ञासिंह ठाकूरसारखे लोक जन्माला येत नाहीत. सर्वात आधी नथुराम गोडसेच्या विचारांचा प्रचार करणाऱ्यांना लोकशाहीचे शत्रू घोषित केले जाईल हे जाहीर करावे. दहशतवादी कारवायांसाठी दोषी ठरवण्यात आलेल्यांना बक्षिस दिले जाणार नाही’.

नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या आझम खान यांनी जर केंद्र सरकारला खरेच मदरशांची मदत करायची असेल तर त्यांनी स्तर उंचावला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.