मदतीसाठी मोडली १ लाखाची ‘एफडी’, दुबई ट्रिपसाठी ठेवलेली मुदत ठेव राष्ट्रीय कार्यास अर्पण

120

 

सोलापूर, दि.१ (पीसीबी) – कोरोना या महाभयानक विषाणूने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. त्या विषाणू विरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते.

आव्हानानंतर देशाभरातील सेलिब्रिटींकडून मदतीचा ओघ सुरू झाला. सोलापूरमधून देखील तरुण वर्ग या मदतीसाठी पुढे येत आहेत.

सोलापूरातील गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी त्यांच्या दुबई ट्रिप साठी ठेवलेली १ लाखाची मुदत ठेव मोडून पंतप्रधान कोविड १९ फंडसाठी अाणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ३५ असे एकूण ७० हजार रुपये राष्ट्रीय कार्यास अर्पण करण्याचा निर्णय घेतला आणि तसे आॅनलाईन द्वारे निधी जमा देखिल केला.उर्वरित तीस हजार रुपयांची रक्कम ही मिशन एक टन रेशन वाटपासाठी खर्च करण्यात येणार अाहे.

गिरिकर्णिका फाऊंडेशन ही संस्था सोलापूरच्या पर्यावरण आणि शहर विकासाच्या दृष्टीने स्थापन झालेली संस्था असून संस्थेच्या वतीने सेव्ह सोलापूर सिटीझन फोरम आणि मिशन सोलापूर ३८ डिग्री २०३०च्या कामांचे कौतुक सर्व स्थारातुन होत आहे. गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या वतीने ह्या लॉक डाऊन च्या दरम्यान गरजु कुटुंबासाठी सोलापूरकरांकडुन एक टन शिधा गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी गिरिकर्णिका फाऊंडेशन ने याला मिशन एक टन रेशन ह्या संकपनेने कार्य सुरु आहे.

सदर कार्याची प्रेरणा घेऊन सेव्ह सोलापूर सिटीझन फोरम च्या व्हॉट्स अॅप ग्रुप सदस्यांनी देखील त्यांच्यापरीने पीएमअो आणि सीएमअो कार्यलयाला मदतनिधी स्वाधीन केला आहे. मिशन एक टन रेशन ला सोलापूरच्या सर्व स्थरातुन उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या या जगावर काळाने अाघात केला अाहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या सारख्या कदर दानाची गरज आहे.

राष्ट्रावर आलेल्या ह्या आपत्ती मध्ये सर्व सरकारी यंत्रणा आहो रात्र नि:स्वार्थपणे स्वतःला झोकून दिले आहे. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न केला अाहे. त्यासाठी माझी एक लाखाची ठेवलेली एफडी मोडून ही मदत करत आहे. अशीच छोटीशी मदत सर्वांनी केल्यास देशावरचे संकट आपोअाप टळण्यास मदत होईल.

WhatsAppShare