मग संजय राऊत राज्य सरकारवर खटला भरणार आहेत का?

33

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – देशात ऑक्सिजनच्या अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचा अहवाल केंद्र सरकारने मंगळवारी संसदेमध्ये सादर केला. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर खटला भरावा, असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलाच सडेतोड उत्तर दिलं आहे.

ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाले नाहीत असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. परंतू महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात माननीय उच्च न्यायालयात राज्यात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही, असं प्रतिज्ञापत्र दिलं आहे. मग संजय राऊत राज्य सरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्टिट केलं आहे. संजय राऊत यांना बोलायला शब्द सुचत नाहीत, असं कानावर आलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच आतापर्यंत राज्य सरकारने केंद्र सरकारला ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले याची माहिती दिली आहे का?, जर ती नसेल दिली तर आता राज्य सरकार ती देणार आहेत का? त्याचप्रमाणे चुकीची माहिती जर कोणी संपादकांना देत असेल, तर याची जबाबदारी कोणावरती निश्चित करणार?, असे अनेक प्रश्न चित्रा वाघ यांनी केले आहेत.

दरम्यान, संजय राऊतांच्या वक्तव्यावर संजय राऊत निर्लज्जपणालाही मर्यादा असतात. ठाकरे सरकारने न्यायालयात केलेले खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवत जा, असं भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

WhatsAppShare