मंदिरात दर्शनाला निघाले होते; पण काळाने केला घात…

0

भोसरी, दि. 6 (पीसीबी) : सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घराजवळ असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात निघालेल्या एका वृद्धाला दुचाकीने जोरात धडक दिली. त्यात त्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना 2 जानेवारी रोजी संत तुकाराम नगर, भोसरी येथे घडली.

शंकर वाघू दळवी (वय 72, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. याबाबत रमेश शंकर दळवी (वय 40) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 14 / एच झेड 2456 या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश यांचे वडील शंकर दळवी 2 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात जाण्यासाठी निघाले होते. रस्त्याने पायी चालत जात असताना त्यांना भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीने पाठीमागून धडक दिली. त्यात त्यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare