मंदिरात डावा पाय पुढे करून प्रवेश केल्याने विवाहितेचा छळ

32

निगडी, दि. २१ (पीसीबी) – लग्न झाल्यानंतर देवदर्शनासाठी गेल्यावर मंदिरात डावा पाय पुढे करून प्रवेश केल्याने विवाहितेचा छळ केल्याची घटना सोमवार पेठ पुणे येथे घडली. याबाबत पीडित विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रथमेश राजीव गिरमे (वय 29, रा. सोमवार पेठ, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्याच्यासह सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 डिसेंबर 2020 चे 26 मार्च 2021 या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेला तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पासून आरोपींनी माहेरहून पैसे घेऊन येण्याची मागणी केली. माहेरहून पैसे आणण्यास विवाहितेने नकार दिला. त्यावरून आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करत त्रास दिला. तसेच लग्नानंतर देव दर्शनासाठी गेल्यावर मंदिरात प्रवेश करताना डावा पाय पुढे करून प्रवेश केल्याच्या कारणावरून आरोपी नणंदेने विवाहितेला मारहाण करून तिचा छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare