“मंदिरांचेही फायर ऑडीट तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्या”

0

मुंबई,दि.१३(पीसीबी) – शासकीय गलथान कारभारामुळे भंडाऱ्यात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण याचबरोबर एक गोष्ट समोर आली आहे की, पंढरपूर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरा सह अनेक देवस्थानांचे फायर ऑडीट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की ज्या देवस्थानांमधे मोठ्या प्रमाणात गर्दी होते अशा सर्वच देवस्थानांचे फायर ऑडीट तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. जर असे झाले नाही आणि दुर्दैवाने भंडाऱ्यासारखी घटना देवस्थानांत घडली तर झालेल्या जीवितहानीस ठाकरे सरकार जबाबदार असेल असे भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे.

WhatsAppShare