मंत्री होण्याअगोदर त्यांना तर कुत्र पण ओळखत नव्हत – रविकांत तुपकर

36

सातारा, दि. १५ (पीसीबी) – आम्हाला आंदोलनाची पद्धत शिकवणाऱ्यांना मंत्री होण्याअगोदर कुत्रे पण ओळखत नव्हते, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर रविकातं तुपकर यांनी ही टीका केली आहे.

सरकार बदलले तेव्हा वाटले होते नवीन काहीतरी घडेल पण या सरकारच्या धोरणामुळे शेतकरी पार देशोधडीला लागला आहे, असा देखील टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे.

शेतकऱ्यांनी चार दिवस त्रास सहन करावा, सरकारला तुमच्या पाया पडायला लावले नाही तर नाव सांगणार नाही, असे सांगत तुपकर  यांनी चंद्रकात पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.