मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

76

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – सावकाराच्या जाचाला कंटाळून मंत्रालयासमोर आज (बुधवार) एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सकाळी नऊच्या सुमारास मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर घडला. मात्र पोलिसांनी वेळीच महिलेला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

अलका कारंडे (वय ३९, रा. उस्मानाबाद, ता. परंडा, गा. शिरगिरवाडी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवार सकाळी नऊच्या सुमारास मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर अलकाबाई कारंडे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयाच्या गार्डन गेटवरील पोलिसांनी अलकाबाई यांना वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. त्यांची विचारपुस केली असता सावकाराच्या जाचाला कंटाळून आपण हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले आहे.